Madhuri Kabre’s Work stands out for its innovative approx to literacy critisism and analysis. She ...
Her poetry and prose are infused with deep emotional and philosophical reflections, providing readers with ...
As a gold medalist in Sanskrit, her scholarly background ensures that her works are not ...
समाजात जात, धर्म, पंथ, देव या पलीकडे जावून, विवेकाने विचार करणारा, बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्ति किंवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी मधुरजग फाउंडेशनची स्थापना करत आहोत. लेखिका आणि विचारवंत माधुरी काबरे आणि त्यांचे पती जेष्ठ लेखक जगदीश काबरे यांच्या नावरून या फाउंडेशनला “मधुरजग फाउंडेशन” हे नाव देण्यात आले. हे दांपत्य त्यांच्या तरुणाई पासून अत्यंत स्पष्ट भूमिका घेऊन समाजिक जीवनात जमेल तसे योगदान देत होते. त्यासाठी त्यांनी विपुल लिखाण केले आहे. मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी प्रथम मानवाच्या जीवनातील अंधश्रद्धा, कर्मकांडे आणि कट्टर धर्मांधता नष्ट झाली पाहिजे असा यांचा दृढ विश्वास. म्हणून या क्षेत्रात यांनी योगदान देण्यास सुरवात केली.
1995 साली बेलापुर, नवी मुंबई येथे त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालू केले. वरकरणी एक कडक, नेमस्त शिक्षक म्हणून जगदीश काबरे यांची ओळख झाली पण अधिक परिचय झाल्यावर ते मनातून तेवढेच हळवे आणि सहृदयी आहेत असे लक्षात आले. सोबतच वेगवेगळ्या शाळांमध्ये विज्ञानाचे अभिनव प्रयोग विद्यार्थ्यां समोर सादर करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवत होते. दुसरीकडे निसर्गप्रेमी, खाद्यप्रेमी, जीवनावर आरस्पानी प्रेम करणाऱ्या सौ. माधुरी काबरे. सर्व काही छान चालल होत पण एक दिवशी अचानक माधुरी मॅडमची तब्येत बिघडली आणि होत्याचे न्हवते झाली. त्यांना कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतरचा काळ या कुटूंबासाठी फारच कसोटीचा होता, वेदनादाई होता. या दरम्याने हे दांपत्य सांगली येथे शिफ्ट झाले. दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी माधुरी काबरे यांचे निधन झाले. काबरे सर पूर्ण खचुन गेले. काही काळाने ते सावरले परंतु त्यांच्या मनात आजही ते दु:ख घर करून बसले आहे. आम्ही ज्यावेळी गप्पा मारत असतो त्यावेळी माधुरी मॅडमचा विषय निघाला की ते हळवे होतात. प्रसंगी डोळ्यातून अश्रु येतात. एका जेष्ठ तर्क–कठोर लेखकाचे असे काळाच्या ओघात खचुन जाताना पाहणे सुद्धा तेवढेच हृदयद्रावक असते.
आता पुढे काय,
कोणतेही वडीलोपार्जित आर्थिक पाठबळ नसताना वयाच्या चाळीशी नंतर स्वकर्तृत्वावर त्यांनी जी पुंजी जमवली त्याच्या काही भागाचा विनियोग सामाजिक कार्यासाठी व्हावा असे ठरले आणि आम्ही मधुरजग फाउंडेशनची स्थापना केली. अनेक ट्रस्ट राजकीय नेत्याचे किंवा उद्योगपतींचे असतात, अनेक ट्रस्ट धार्मिक कार्यासाठी साठी असतात, अनेक ट्रस्ट नातेवाईकांच्या सुविधेसाठी असतात मात्र “मधुरजग फाउंडेशन चे या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.” किमान महाराष्ट्रातील विवेकावादी व्यक्तीच्या आणि संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आमची भूमिका असेल.
हे कार्य वृद्धिंगत होणीसाठी देशातील समविचारी विवेकी नागरिकांचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे.
आपला विनीत;
कुमार नागे
सचिव
मधुरजग फाउंडेशन